जागावाटपाच्या वाटाघाटीवरून राहुल गांधी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांवर नाराज
जय जलाराम फूड्सच्या एक्सपीरिअन्स स्टोर्स आणि डेझर्ट डेस्टिनेशनला नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर, 4 ऑक्टोबर ।
नगर येथील जय जलाराम फूड प्रॉडक्ट्स बद्दलनगरकरांना १९९७ पासून ह्या नावाची ओळख झाली आहे. महाराष्ट्रातली पहिली शुद्ध शाकाहारी बेकरी म्हणजे जय जलाराम ती बंगाल चौकी येथीलजागेत सुरू झाली आणि बेकरी पदार्थांचे वितरण येथूनच होई. त्याच जागेत आता नवी व सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. जुन्याशी नाते अधिक घट्ट करायचे म्हणून आपण नवीन जागेत एक्सपीरिअन्स स्टोर्स' सुरू केले आहे.या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,अशी माहिती नकुल चंदे,दीपाचंदे व मयुरी चंदे यांनी दिली.
बेते म्हणाले बेकरी व्यवसाय, हे क्षेत्र अत्याधुनिक होत आहे.नवनवीन कल्पना स्वीकारत आहे, हेच या माध्यमा तूननगरकरांपुढे मांडत आहोत. पाव शतकानंतर, म्हणजे २७ वर्षांनंतर आधुनिक इमारतीत आलोआहेत , म्हणून उत्पादनांमध्ये काही वाढविण्याचा प्रयत्न केला. ह्या निमित्ताने आमच्या बेकरीत २५-२७ नवीन वेगळ्या पदार्थांचे उत्पादन सुरू करीत आहोत.चव आणि आरोग्य ह्याची सांगड आम्ही नेहमीच घातली. ती ह्या नवीनउत्पादनांमध्येही दिसेल. ही बेकरी सुरू करणारे माझे वडील दिवंगत दिलीप चंदे आणि त्यांनासाथ देणारी माझी आई दीपा चंदे ह्यांनी हायजिन नेहमीच सर्वाधिक महत्त्वाचे मानले, ती स्वच्छता, उत्पादनाची आरोग्यदायी पद्धत आजही कायम आहे. बेकरीतील बहुसंख्य काम मानवी हाताचा स्पर्श न होता पूर्ण होते. जेथे माणसांचा संबंध येतो, ते आमचे कर्मचारी व्यक्तिगत आरोग्याची पूर्ण काळजी घेतात. सर्व घटक पदार्थ आम्ही अत्युत्व दजचिच वापरतो,ह्याची आपल्या सर्वांना जाणीव आहे.नवीन पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करण्यापूर्वी आम्ही प्रयोग केला बंगाल चौकीवरील आधुनिक इमारतीतील 'जय जलाराम एक्सपीरिअन्स स्टोर्स'चे पारंपरिक पद्धतीने उद्घाटन केले नाही. हे नवीन पदार्थ ग्राहकांना, स्नेहीजनांना आणि एकूणच नगरकरांना कसे वाटतात, हे जाणून घेण्यासाठी गेले काही दिवस आम्ही टेस्ट फेस्ट आयोजित करीत आहोत.रोज जवळपास २०० मित्रमंडळी, खेही, ग्राहक ह्यांना येथे आमंत्रित करती विविध पदार्थांची ते चव घेतात, त्या बद्दलचा त्यांचा अभिप्राय आम्ही नोंदवून घेतो. सर्वांचे समाधान होईल, अशी खात्री झाल्यावरच ही सर्व उत्पादने बाजारात उपलब्ध होतील.आमच्या नवीन पदार्थांबद्दल सांगायचे तर जगात बेकरीचे जे काही पदार्थ आहेत आणि जे शाकाहारी पद्धतीने बनविता येतील.ते सर्व नगरकरांना मिळालेच पाहिजेत.हा जय जलारामचा ध्यास आहे. आम्ही ते आमचे कर्तव्य आणि जबाबदारी मानतो. हे पदार्थ चविष्ट आहेत, पौष्टिक आहेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आरोग्यदायी आहेत.